आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:पत्नीच्या खून प्रकरणातील पतीला हैदराबाद येथून पोलिसांनी केली अटक

परभणी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी पूर्णा रेल्वेस्टेशन परिसरात महिलेचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी परभणी पोलिसांनी आरोपी पतीस हैद्राबाद येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, पूर्णा रेल्वे स्टेशन परिसरातील तडीपार मैदानात एका महिलेचा मृतदेह आढळला होता. शरीरावर दगडाचे वार करून महिलेचा खून करण्यात आल्याचा संशय आल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक संशयित व्यक्ती आढळून आला. त्याचे फोटोही पोलिस प्रशासनाने प्रसारित केले होते. तपासादरम्यान आरोपी हा हैद्राबाद येथील असल्याची माहिती मिळाल्यानंतर परभणी पोलिसांनी २२ रोजी हैदराबाद येथे केलेल्या कारवाईत त्यास ताब्यात घेतले. अरबाज खान पठाण (♦२२, रा. हैदराबाद) असे आरोपीचे नाव असून मृत महिला ही त्याची पत्नी आहे. कौटुंबिक वादातून आरबाज खानने १९ रोजी तिचा खून केला होता.

बातम्या आणखी आहेत...