आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात रविवारी (१८ डिसेंबर) दुपारी बसचा अपघात झाल्याने सहा प्रवासी जखमी झाले. नांदेड आगाराची बस (एमएच २० बीएल ३७२२) जिंतूर येथून नांदेडकडे जात होती. जिंतूर-परभणी महामार्गावरील कोक गावाजवळ दुचाकीस्वाराला वाचवताना हा अपघात झाला.
रस्ता सोडून बस एका खड्ड्यात जाऊन आदळल्याने सहा जण जखमी झाले आहेत. यामध्ये बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. या अपघातात बसचे चालक मोहंमद मुस्तफा मोहंमद अकलम, वाहक गजानन बापूराव हिवरे (दोघेही रा.नांदेड) यांच्यासह नेहरूबी शेख हुसेन, शेख हुसेन शेख अकबर (रा. दोघेही देवसडी), नामदेव यादवराव भरकड (रा.परभणी), राजू लक्ष्मण पवार (रा.बोरी) असे एकूण सहा जण जखमी झाले आहेत. जखमी चालक, वाहकासह अन्य चार प्रवाशांना बोरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमीतील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात येणार असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.