आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी ग्रामीण ठाण्यात फसवणूक:डाकपालाने केला दीड लाख रुपयांचा अपहार

परभणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टपाल खातेदाराकडून सुकन्या समृध्दीची रक्कम स्वीकारून ती शासकीय खात्यात जमा न केल्यामुळे डाकपालावर दि. ४ रोजी परभणी ग्रामीण ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, रामकिशन भानुदास हजारे हे परभणी तालुक्यातील भोगाव साबळे येथील पोस्ट कार्यालयात कार्यरत असताना त्यांनी २७ ऑक्टोबर २०१६ ते २० फेब्रुवारी २०१७ या कालावधीत खातेदाराकडून सुकन्या समृध्दी योजनेचे १ लाख ४९ हजार रुपये जमा केले. त्याची खातेदाराच्या पासबुकात नोंद केली. पण ही रक्कम शासनाकडे जमा न करता अपहार केला. चौकशीत संबंधिताने रक्कम स्वतःसाठी वापरली असल्याचा जवाब दिला.

बातम्या आणखी आहेत...