आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉटरग्रीड योजनेसारख्या अभिनव योजना बंद:राज्य सरकार हे तर स्थगिती सरकार

परभणी18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने मराठवाडा विकास महामंडळ, मराठवाडा वॉटरग्रीड योजनेसारख्या अभिनव योजना बंद केल्या. हे सरकार स्थगिती सरकार असल्याचा आरोप केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होऊ शकले असते, पण राज्य सरकारने याचा विचार केला नाही. तसेच वीज समस्येला राज्य सरकारच जबाबदार असल्याचेही ते म्हणाले.

परभणी येथे संजीवनी मित्रमंडळातर्फे स्व.अ‍ॅड. शेषराव भरोसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चारदिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद‌्घाटनप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर, माजी आमदार मोहन फड, आमदार मेघना बोर्डीकर, कुलगुरू डॉ. अशोक ढवण, महोत्सवाचे आयोजनकर्ते आनंद भरोसे आदींची उपस्थिती होती. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांचा आरोप

राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन करताना डॉ. कराड व मान्यवर.

बातम्या आणखी आहेत...