आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकने दुचाकीवरील दोघा शिक्षकांना जोराची धडक दिली. यात मानवत येथील दोघा शिक्षकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (१४ मार्च) सकाळच्या सुमारास घडली. मानवत येथील शकुंतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालयातील शिक्षक गंगाधर राऊळ व रामेश्वर कदम हे नेहमीप्रमाणे सकाळी दुचाकीवर (एमएच २२ एएच ७०३१) शाळेत येत होते. शहरातून जाणाऱ्या कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल येथे पाथरीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १३ आर ३६८४) ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दोघा शिक्षकांना जबर मार लागून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. उपचारासाठी त्यांना तातडीने मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यानी मृत घोषित केले. दरम्यान ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
गतिरोधकाची आवश्यकता पाथरीहून मानवत शहरात प्रवेश करताना प्रताप चौकात कुठल्याही प्रकारचे गतिरोधक नाहीत. राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते निर्मल क्र. ६१ यावरून सर्वच वाहने अतिशय वेगाने जातात. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनामध्ये वाढ झालेली आहे. याकरिता गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.