आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडू जाधवांकडून उद्धव ठाकरेंना घरचा आहेर:स्वत: मुख्यमंत्री झाले तर मुलाला मंत्री करायला नको होते; त्यामुळे चोरांना गद्दारीची संधी मिळाली

परभणी17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणीचे खासदार बंडू (संजय) जाधव यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला आहे. जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते तर त्यांनी आदित्य ठाकरेंना मंत्री करायला नको होते, कुणाकडे तरी पक्षाचे नेतृत्व द्यायला हवे होते असे वक्तव्य केले आहे.

बंडू (संजय) जाधव काय म्हणाले?

खासदार बंडू (संजय) जाधव म्हणाले की, सत्ता असताना अडीच वर्षे आमचा जो लाभ व्हायला हवा होता तो झाला नाही. तो काळ असाच गेला, एक सत्तेचा भाग जो आपल्याला मिळायला हवे होते तो मिळाला नाही याचे दु:ख होते असे जाधवांनी म्हटले आहे. ही वस्तुस्थिती आहे, मी केवळ त्यावर बोलतोय, उद्धव ठाकरेंनी ज्यावेळी पक्ष संघटनेला वेळ द्यायला हवे होते तो दिला नाही, किंवा कुणाला पक्ष संघटनेकडे बघायला हवा होते तो वेळ उद्धव ठाकरेंनी दिला नाही. म्हणून आमच्यावर ही वेळ ओढावली आहे. म्हणून या चोरांना संधी मिळाली असा निशाणा शिंदे गटाला लगावला आहे. जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते तर त्यांनी आदित्य ठाकरेंना मंत्री करायला नको होते, आणि आदित्य ठाकरेंना मंत्री करायचे होते तर स्वत: मुख्यमंत्री व्हायला नको होते, असा सल्ला खासदार बंडू (संजय) जाधव यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

बंडू (संजय) जाधव यापुढे बोलताना म्हणाले की, दोघांनी खुर्च्या आटवल्या मुळे ही गद्दारी झाली. बाप गेला की पोरगा आपल्या बोकांडी बसेल या भावनेतून जर मी माझी वेगळी चूल पेटवली तर मग काय बिघडेल अशा भावनेतून ही गद्दारी झाली असा टोला बंडू जाधवांनी लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...