आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकची चोरी करून भंगारात विकणाऱ्या टोळीस पकडले:परभणीतील ३ आरोपींच्या वसई पोलिसांनी मुसक्या आवळल्या

परभणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात विविध ठिकाणी ट्रक चोरून ते भंगारात विकणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष-२ वसई पोलिसांनी अटक केली आहे. वसई-विरार शहर मनपाचे कचरा संकलित करणारे ट्रक चोरी झाल्याच्या प्रकरणातही त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. प्राप्त माहिती व तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपी वैजनाथ लांडगे (६५, रा. साईबाबानगर, परभणी), जहीर शेख (४०, रा. फुलबाग कॉलनी, परभणी), मुजीब शेख (४०, रा. तलाब कट्टा, ता. मानवत) यंाना परभणी येथून ताब्यात घेतले आहे.

आरोपींकडे चौकशी केली असता ट्रक चोरीच्या गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून चोरलेल्या ४ डंपरपैकी १ डंपर आणि इतर ३ डंपर तोडून त्याचे पार्ट वेगळे काढून ते स्क्रॅपमध्ये विक्री केले असल्याने तपास पथकाकरवी चोरलेल्या ३ डंपरचे इंजिन, क्लचपेट, गिअर बॉक्स आणि डिस्कसह टायर असा एकूण पाच लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वैजनाथ लांडगेविरोधात नवी मुंबई आणि परभणी येथे चोरीचे ४ गुन्हे नोंद आहेत. दरम्यान, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलिस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा-२ वसई युनिटचे पोलिस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहायक पोलिस निरीक्षक सुहास कांबळ आदींनी कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...