आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझरी व परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊण तास अतिवृष्टी झाली. या पावसामध्ये विशेष करून आनंदनगर भागातील घरे पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. जिंतूर-परभणी रोडचे पुलाचे बांधकाम सुरू असल्याने पर्यायी पूल म्हणून अतिशय छोटा पूल या ठिकाणी उभारला आहे. या पुलामधून पाण्याचा विसर्ग न होता पाणी तुंबत आहे. परिणामी आनंदनगरच्या सखल भागात पाणी घुसून नागरिकांची गैरसोय होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.