आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:दोन महिन्यांचे वेतन थकल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

परभणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दोन महिन्यांचे वेतन थकवल्याच्या निषेधार्थ परभणी येथील अस्थिव्यंग रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत गुरुवारी (५ जानेवारी) निदर्शने केली. अस्थिव्यंग रुग्णालयातील ३० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला होता. जिल्ह्यातील एकमेव अस्थिव्यंग रुग्णालय आहे. येथे ५० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या आहे. परंतु अनुदान नसल्यामुळे दोन महिन्यांचे वेतन प्रलंबित आहे.

बातम्या आणखी आहेत...