आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंद पडलेला व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी तसेच नवीन मशीन्सची खरेदी करुन व्यवसाय नफ्यात आणण्याचे अमिष दाखवून एका व्यावसायिकाची एक काेटी आठ लाख 53 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात तीन आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी साेमवारी दिली आहे.
संदीप राम निरंजन डागा, राम निरंजन डागा, व एक महिला अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. याबाबत धीरज शांतीलाल ओस्तवाल (वय-46,रा.एरंडवणा,पुणे) यांनी पोलिसांकडे आराेपी विराेधात तक्रार दाखल केलेली आहे. सदरचा प्रकार 25 मे ते 14 नाेव्हेंबर 2022 यादरम्यान घडलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार धीरज ओस्तवाल यांचा पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर श्रीकृष्ण अर्पाटमेंट येथे कार्यालय आहे. चेन्नई येथे मेटल कटिंग आणि प्रक्रिया करण्याचा व्यवसाय होता. परंतु सदर व्यवसाय काही कारणाने बंद पडलेला हाेता. संबधीत व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी तसेच नवीन मशीन्स घेण्यासाठी पैसे लावल्यास चांगल्या प्रकारे नफा मिळेल असे अमिष आराेपींनी तक्रारदार यांना दाखवले हाेते.
त्यानुसार सदर व्यवसाय पुन्हा सुरु करण्याबाबत दाेघात कायदेशीर करार झालेला हाेता. तक्रारदार यांनी त्यानुसार नवीन विशेष प्रकारच्या मशीन खरेदीसाठी एक काेटी आठ लाख 53 हजार रुपये गुंतवले हाेते. परंतु आराेपींनी त्यानंतरही प्रत्यक्षात सदर ठिकाणी काेणताही व्यवसाय सुरु केला नाही आणि गुंतवणुक केलेला कारखाना तक्रारदार यांना अंधारात ठेऊन परस्पर दुसऱ्यास विक्री केला. त्यानंतर तक्रारदार यांनी सदर पैशांची किंवा नवीन मशीनची मागणी केली असता, ते पैसे परत न करता त्यांना उडवाउडवीची उत्तरे आराेपींनी देऊन त्यांची फसवणुक केली आहे. याबाबत पुढील तपास डेक्कन पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस जाधव करत आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.