आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमली पदार्थ तस्करी:पुण्यात 2 कोटी रुपयांचे 1 किलो कोकेन जप्त,  एका नायजेरियन तरुणाला अटक

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ तस्करी सुरू झाली आहे. शुक्रवारी पुणे शहर पोलिस गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल २ कोटी २० लाख रुपयांचे १ किलो कोकेन जप्त केले आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे. याप्रकरणी एका नायजेरियन तरुणाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. फॉलरिन अब्दुल अजीज अन्डोई असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अमली पदार्थविरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेगळे, शैलजा जानकर व त्यांच्या पथकाला गुरुवारी रात्री कोंढवा पोलिस ठाण्यांतर्गत मोठ्या प्रमाणात कोकेन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. आरोपी फॉलरिन अब्दुल अजीज अन्डोई हा उंड्री मंतरवाडी परिसरात आर पॉइंट सोसायटीच्या समोर त्याच्या कारमध्ये बसला होता. त्याची चौकशी केली असता त्याच्या झडतीत २ कोटी २० लाख ८ हजार रुपयांचे १ किलो ८१ ग्रॅम कोकेन सापडले. पोलिसांनी या कोकेनसह ६ मोबाइल फोन, एक कार आणि दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे जप्त केले. पोलिस रॅकेटचा शोध घेत आहेत.

आरोपी सध्या जामिनावर आला आहे बाहेर फॉलरिन आरोपीवर एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क). २१(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर यापूर्वी चतु:श्रृंगी पोलिस ठाणे येथे अमली पदार्थ तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल असून नुकताच तो येरवडा कारागृहातून जामिनावर मुक्त झाला होता. तसेच कस्टम विभागानेसुध्दा त्याच्यावर यापूर्वी कारवाई केली होती.

बातम्या आणखी आहेत...