आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांचे धोतर फाडणाऱ्यांना 1 लाखांचे बक्षीस देणार:राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात बॅनरबाजी; कोश्यारींच्या वक्तव्याचा केला निषेध

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात बॅनरबाजी केली आहे. बॅनरवर राज्यपालाचे धोतर फाडणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस दिले जाईल अशी घोषणा राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांनी केली आहे.

काय आहे बॅनरवर?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याचा निषेध करत पुण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप शशीकांत काळे यांनी बॅनर लावले आहे. आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श होते आणि कायम राहणारच. उतरत्या वयात धोत्रात घाण करण्यासारखे विषारी वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध आहे. त्यांचे धोतर फाडणाऱ्यास आणि फेडणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असा मजकूर या बॅनरवर आहे.

कोश्यारीचे वक्तव्य काय?

शिवाजी महाराज जुन्या काळातले विषय आहेत. तुमचे हिरो तुम्हाला इथेच मिळतील. त्यासाठी बाहेर जायची गरज नाही. डॉ. आंबेडकर, डॉ. गडकरी, पवार हेच सध्याचे आदर्श आहेत, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये शिकायचो. तेव्हा आमचे शिक्षक विचारायचे, तुमचा फेवरेट हिरो कोण. त्यावेळी कोणाला सुभाषचंद्र, कोणाला नेहरूजी, कोणाला गांधीजी चांगले वाटले. तुम्हाला कोणी विचारले, तुमचा फेवरेट हिरो कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे हिरो मिळतील. शिवाजी महाराज जुन्या काळातला विषय. मी नव्या काळाबद्दल बोलतोय. ते येथेच मिळतील. डॉ. आंबेडकर, डॉ. गडकरी, पवार हेच सध्याचे आदर्श असल्याचे कोश्यारी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...