आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेती उद्ध्वस्त:अफूची 11 लाखांची 1 हजार 374 झाडे जप्त

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

होळकरवाडी परिसरात बेकायदा केल्या जात असलेल्या अफूच्या शेतीवर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकत ती शेती उद्ध्वस्त केली. या वेळी ११ लाख ६० हजारांची तब्बल १३७४ अफूची झाडे पोलिसांनी जप्त केली. शेती करणाऱ्या दोन शेतकऱ्यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजाराम दामोदर होळकर (५०, रा. होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) आणि बाळू किसन कटके (५०, रा. पाटीनगर, होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गस्तीवरील पोलिस पथकाला होळकरवाडी परिसरात औताडेवाडीकडून होळकरवाडी जाणाऱ्या ओढ्यातील चिमणी तलावाच्या शेजारी गव्हाच्या शेतात अफूची शेती केली जात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. लोणी काळभोर पोलिसांचे पथक होळकरवाडी येथे बुधवारी दुपारी दाखल झाले. दरम्यान, होळकरवाडी येथील सर्व्हे नंबर १८० आणि सर्व्हे नंबर १८३ येथे बेकायदा केली जात असलेल्या अफूच्या शेतीवर कारवाई करण्यात आली. या वेळी दोन्ही शेतमालकांना पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई करत अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...