आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यप्रदेशातील दोघांकडून दहा किलो गांजा जप्त:पुण्यातील येरवडा भागात अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या मध्यप्रदेशातील दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून दोन लाख रुपयांचा दहा किलो गांजा जप्त करण्यात आला अशी माहिती बुधवारी दिली आहे.

अजय मुक्तीलाल पवार (वय 28), अरविन सुखलाल सोलंकी (वय 28, दोघे मूळ रा. बडवानी, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. येरवडा भागात अमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचारी गस्त घालत होते. मध्यप्रदेशातील दोघे जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत गांजा आढळून आला. पवार आणि सोलंकीकडून दहा किलो 310 ग्रॅम गांजा, मोबाइल संच असा दोन लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, रवींद्र रोकडे आदींनी ही कारवाई केली.

पोलिस महिला अधिकाऱ्याला अरेरावी

न्यायायल आवारात पोलिस उपनिरीक्षक महिलेकडे ओरडून फाईल मागत त्यांच्यावर धावून जाणाऱ्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २२ नोव्हेंबरला दुपारी पावणेतीनच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयाच्या गेटवर घडली अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.

अमोल घोले (वय 47, रा. दादर, मुंबई ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महिला अधिकाऱ्याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फसवणूकीच्या गुन्ह्यातील तपास फिर्यादी महिला अधिकारी करीत आहेत. संबंधित आरोपी अमोल घोले त्यामध्ये फिर्यादी असून तो 22 नोव्हेंबरला शिवाजीनगर न्यायालयाबाहेर आला होता. त्यावेळी त्याने महिला पोलीस उपनिरीक्षकाला गुन्ह्याची फाईल आमच्या ताब्यात द्या, कोर्टाचे समन्स आले असल्याचे सांगितले. मात्र, अधिकाऱ्यानी फाईल कोर्टाच्या ताब्यात असते. लिपीकाकडून फाईल घेउन तुमच्या ताब्यात देते असे सांगितले. मात्र, आरोपी अमोलसह साथीदार महिलेने चिडून जाउन अधिकाऱ्याला अरेरावी केली. त्यांच्या अंगावर धावून जात शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

बातम्या आणखी आहेत...