आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या:बनावट एनएफटी खात्यावर ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करुन 10 लाखांचा गंडा

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना अनाेळखी भामट्याने पुण्यातील एका उच्चशिक्षित तरुणाची फसवणूक केली. यात त्याने​​​ बनावट एनएफटी खात्यावर ऑनलाईन पैसे परस्पर ट्रान्सफर करायला लावत दहा लाखांची फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी आशिष नंदकिशाेर काेळाेगे (वय-26, मु.रा.नाशिक) या तरुणाने वारजे पाेलिस ठाण्यात साेमवारी तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पाेलिसांनी मंगळवारी दिली.

आशिष काेळाेगे हा कामानिमित्त सध्या हैद्राबाद येथे रहाण्यास गेला असून 2 फेब्रुवारीपासून तो पुण्यातील कर्वेनगर भागात हिंगणे हाेम काॅलनी याठिकाणी राहत हाेता. या ठिकाणी मेटामास्क काॅन्ट्रॅक्ट नंबरवर ताे ट्रेडिंग करताना डिस्काॅर्ट अ‌ॅपवर तक्रारदार यांना एक लिंक आली असता, त्यांनी ती लींक उघडली. त्याठिकाणी त्यांनी त्यांचा मेटामास्क अ‌ॅपचा पासवर्ड टाकला असता, अनाेळखीने त्याचा फायदा घेऊन त्यावर बनावट एनएफटी खात्यावर तक्रारदार यांचे नावाचे सात एनएफटी ऑनलाईन ट्रान्सफर करुन एकुण दहा लाख रुपयांची फसवणुक केली.

सहा लाखांचा गंडा

आणखी एक अशीच घटना पुण्यातील ससून राेड येथे घडली. यात सिस्टर ऑफ द क्राॅस यांच्या ईमेल आयडीवर ट्रस्टचे अध्यक्ष ब्राेमादीन, ट्रस्टचे ओळखीचे फादर मथायस, फादर वाॅथर यांच्या मेलआयडी वरुन मेल करण्यात आला. तक्रारदारांच्या व्हाॅटसअ‌ॅप क्रमांकावरही संशयित ग्रेसी लाॅनपन कल्लुकरण (वय-61,रा. पुणे) हा सिस्टर ऑफ द क्राॅसशी संर्पकात राहिला. ट्रस्टचे अध्यक्ष व इतर फादर असल्याचे ईमेलवर त्याने भासवून फादर मथायस, वाॅथर यांचे मित्र ऑपरेशनसाठी भारतात येणार असल्याची थाप मारली. त्यानंतर भारतीय चलनातील पैशांची गरज असल्याचे सांगुन सिस्टर ऑफ द क्राॅस ट्रस्टकडून सहा लाख रुपये ट्रान्सफर करुन फसवणुक केली. याबाबत बंडगार्डन पाेलिस ठाण्यात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

क्युआर काेड स्कॅन करुन फसवणूक

कर्वेनगर भागात राहणाऱ्या वाहिदा मुलानी (वय-४०) यांनी फेसबुकवर त्यांचे अन्नपुर्णा चपाती सेंटरची जाहिरात केली हाेती. ती पाहून पितीश सरकार चाैसा या ओराेपीचा तक्रारदार यांना फाेन येऊन त्याने मी आर्मी कँटीन मधून बाेलत असल्याचे सांगुन चपात्याची ऑर्डर द्यायची आहे असे सांगुन तक्रारदार यांना क्यु आर काेड पाठवुन स्कॅन करण्यास सांगितले.

सुरुवातीला तक्रारदार यांना सहा हजार रुपये पाठविण्यास सांगुन नंतर तक्रारदार यांचे खात्यावरुन आराेपीने एकूण 30 हजार रुपये परस्पर काढून घेवून त्यांची फसवणूक केली आहे. याबाबत वारजे पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...