आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंब बाहेरगावी जाताच चोराने साधला डाव:दोन घरात डल्ला, 10 लाख रुपयांच्या 27 तोळे सोन्याच्या दागिन्यांची लयलूट

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्हयातील हवेली तालुक्यात न्हावी सांडस येथे राहणारे एक कुटुंब बाहेरगावी गेल्याने चाेरटयांनी डाव साधत एका घरामधून मोटरसायकल तर दुसऱ्या घरातून 10 लाख 5 हजारांचा मौल्यवान ऐवज पळवून नेला आहे. याप्रकरणी अज्ञात आराेपी विराेधात लाेणीकंद पोलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विजय साहेबराव शिताेळे (वय-52) यांनी पाेलिसांकडे आराेपी विराेधात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार 19 नाेव्हेंबर ते 20 नाेव्हेंबर दरम्यान घडला आहे. तक्रारदार विजय शिताेळे हे त्यांचे राहते घराचा दरवाजा लाॅक लावून बाहेरगावी गेले हाेते. त्यावेळी काेणीतरी अज्ञात आराेपीने त्यांच्या दरवाजाचा कडी काेयंडा ताेडून घरात प्रवेश करुन घरातील लाेखंडी कपाटातील 27 ताेळे साेने व राेख रक्कम दहा हजार रुपये तसेच त्यांच्या घरा शेजारील अरुण जगताप यांची 20 हजार रुपये किंमतीची माेटरसायकल असा एकूण दहा लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरी करुन नेला आहे. याप्रकरणी पुढील तपास लाेणीकंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस जाधव करत आहे.

तिसऱ्या घटनेत पुण्यातील मंहमदवाडी परिसरात हेवन पार्क गल्ली येथे राहणारे दिनेश ज्ञानदेव जाधव (वय-31) हे 18 ते 20 नाेव्हेंबर दरम्यान बाहेरगावी गेले हाेते. त्यावेळी अनाेळखी आराेपीने त्यांच्या घराचा कडी काेयंडा ताेडून घरात प्रवेश करुन बेडरुम मधील कपाटातील सात ताेळे वजनाचे साेन्याचे दागिने व दाेन लाख 80 हजार रुपये राेख असा एकूण चार लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरुन नेला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात अज्ञात आराेपी विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील काेंढवा परिसरात नवजिस चाैक जवळ एका घरात राहणारे 29 वर्षीय अफ्रिन अरिफ पटेल हे त्यांचे राहते घराचे दरवाजाला लाॅक लावून कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे कुटुंबासह लग्नास गेले हाेते. त्यावेळी काेणीतरी अज्ञात आराेपीने त्यांचे घराचे लाॅक ताेडून घराच्या बेडरुम मधील कपाटातील लाॅकर मधील 45 हजार रुपये किंमतीचे नऊ ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने चाेरी करुन नेले आहे.सदरचा प्रकार 17 ते 20 नाेव्हेंबर दरम्यान घडलेला आहे. या प्रकरणी काेंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी साेमवारी दिली.

बातम्या आणखी आहेत...