आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • 10 Months After The Murder Of A Young Man Due To An Immoral Relationship In Pune, The Police Solved The Murder; Four Arrested Including Wife

पुण्यात अनैतिक संबंधातून तरुणाचा खून:हत्येच्या 10 महिन्यानंतर पोलिसांकडून उलगडा; पत्नीसह चौघांना अटक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती येथून वडगाव निंबाळकर येथून एक तरुण 10 महिन्यापूर्वी बेपत्ता झाला होता. काही दिवसांनी या तरुणाचा मृतदेह सापडला होता. या तरुणाचा खून कुणी आणि का केला याचा छडा लागत नव्हता. यामुळे स्थानिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास करण्यास सांगितले होते. कुठलाही पुरावा नसताना एक एक धागे दोरे जोडत पोलिसांनी अखेर या प्रकरणाचा छडा लावला आहे. या तरुणाचा खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्या पत्नीसह चौघांना अटक करण्यात आली आहे.

वैभव विठ्ठल यादव (वय 31, रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती ,पुणे)या तरुणाचा 10 महिन्यापूर्वी खून झाला होता. त्याच्या खूना प्रकरणी त्याची पत्नी वृषाली (वय 23 ), तिचा प्रियकर रोहित दत्तात्रय खोमणे (दोघे रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती, जि. पुणे), साथीदार सागर सर्जेराव चव्हाण (वय २७), शिवदत्त उर्फ दादा श्रीधर सूर्यवंशी (वय 23, रा. वडगाव तुकाई माता चौक, ता. बारामती, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. वैभव यादव हा 19 फेब्रुवारी 2022 रोजी घरातून बेपत्ता झाला होता. तो बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नी वृषालीने वालचंदनगर पोलीस ठाण्यात दिली होती.

या घटनेचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी पोलिस निरीक्षक अशोक शेळके, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी पथके तयार केले होते. वैभवचा तपास करत असतांना वृषालीचे रोहित खोमणे याच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तिने खून केल्याची कबुली दिली. तिने रोहित खोमणे याच्याशी अनैतिक संबद्ध असल्याचे कबूल केले. यात वैभव अडसर ठरत असल्याने रोहित आणि साथीदारांच्या मदतीने त्याच्या खून केल्याचे कबूल केले. आरोपींनी वैभव यादव याला मारहाण करुन त्याचा मृतदेह हा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील कालव्यात फेकून दिला होता. त्याचा मृतदेह हा लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना आढळून आला होता.

बातम्या आणखी आहेत...