आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 हजार विद्यार्थी नव्वदीपार:बारावीच्या निकालात 3.5% वाढ, सायन्सपेक्षा कॉमर्सकडे विद्यार्थ्यांचा ओढा

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य बोर्डाचा इयत्ता बारावी परीक्षेचा यंदाचा निकाल ९४.२२% लागला आहे. ९३.२९% मुले, तर त्यापेक्षा २.०६% जास्त म्हणजेच ९५.३५% मुली उत्तीर्ण झाल्या. कोरोनात २ वर्षे गेल्यानंतर यंदा बारावीची परीक्षा ऑफलाइन झाली. १४ लाख ३९,७३१ विद्यार्थ्यांपैकी १३ लाख ६,६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

२०२० मध्ये ९०.६६% निकाल, तर २०२१ चा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर झाला होता. यंदा निकालाची टक्केवारी ३.५६% अधिक आहे. १००% गुण मिळविणारा एकही विद्यार्थी नाही. १० हजार ४२ विद्यार्थी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे आहेत. २२४ विषयांचा निकाल १००% लागला. शून्य टक्के निकालाच्या २१ शाळा आहेत.

विभागनिहाय निकाल असा कोकण 97.21% नागपूर 96.52% अमरावती 96.34% लातूर 95.25% नाशिक 95.03% कोल्हापूर 95.07% औरंगाबाद 94.97% पुणे 93.61% मुंबई 90.91% एकूण 94.22%

दिव्य मराठी विश्लेषण

कॉमर्स
- पारंपरिक अभ्यासक्रमात वाणिज्यला अधिक पसंती

- ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या गुणवंतांना राज्यातील प्रतिष्ठित कॉलेजला प्रवेश मिळण्याची शक्यता वाढणार.

सायन्स
- युनिक विषयात प्रवेश मिळण्याची शास्वती

- हमखास नोकरी देणारे बीसीए आणि बी.एस्सी.चे काही विषय खूप विरळ असतात. तिथे प्रवेश मिळण्याचा मार्ग सुकर होईल.

आर्ट‌्स
- राज्यात नामांकित संस्थेतील कॉलेजमधून बी.ए.ची संधी

- मराठीसह इंग्रजी, हिंदी विषयात बी.ए. करता येईल. त्यासाठी राज्यातील नामांकित संस्थेच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो.

60 ते 70 टक्क्यांवर गुण

- पसंतीच्या कॉलेजला मुकणार

- या दशकात बी.कॉम. प्रवेश वाढले आहेत. त्यामुळे या स्लॅबमधील गुणवंतांना हवे असलेले कॉलेज मिळण्याची शक्यता कमी होईल.

विषय निवडण्याचे स्वातंत्र्य
या स्लॅबमधील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना हवे असलेले शहर, कॉलेज आणि विषय निवडण्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य मिळू शकेल.

अनुदानित कॉलेजला पसंती
५१ पेक्षा अधिक विषयात बी.ए. आहे. या कोर्सेसना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्राधान्यक्रम ठरवता येऊ शकतो.

60 टक्क्यांच्या आतील गुण
विनाअनुदानित कॉलेजमध्ये थोडे अधिकचे शुल्क आकारतात म्हणून तिथे जागा असतात. अशा कॉलेजला प्रवेश मिळू शकतो.

पीसीबी, पीसीएमला प्रवेश
पीसीबी, पीसीएम या पारंपािक विषयात बीएस्सी करण्यासाठी राज्यातील कोणत्याही कॉलेजला प्रवेश मिळण्याची संधी आहे.

प्रवेश मिळण्याची खात्री
३५ ते ५९ टक्के गुण घेणाऱ्यांना बी.ए. ला प्रवेश मिळण्याची खात्री आहे. पण पसंतीचे कॉलेज मिळेलच याची खात्री नाही.

करिअर घडवण्यासाठी नव्या वाटा
मेडिकल-इंजिनिअरिंगशिवाय ४००० कोर्सचा पर्याय उपलब्ध
मेडिकल, इंजिनिअरिंग म्हणजेच करिअर आहे, असे अजिबात नाही. पालकांनी आपल्या पाल्यांना अन्य कोर्सेस आहेत. याची माहिती द्यावी किंवा त्यांना कोर्स निवडण्याचे स्वातंत्र्य तरी द्यावे.

१०० पेक्षा जास्त विषयात बी.एस्सी. पदवीची संधी
यंदा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शंभरपेक्षा अधिक स्पेशलाइज्ड विषयात बी.एस्सी. करण्याची संधी आहे. या विषयांत मायक्रोबायलाॅजी, बायोटेक्नाॅलाॅजी, फाॅरेन्सिक सायन्स, फूड टेक्नाॅलाॅजी, स्टॅटिस्टिक, नर्सिंग, मेकॉट्राॅनिक्स, बायोफिजिक्स, बायोकेमिस्ट्री, एन्व्हाॅयर्नमेंट, फिशरी, संगणक व माहिती तंत्रज्ञानशास्त्राचा समावेश आहे.

बॅचलर ऑफ आर्ट‌्स
बी.ए. पदवी आता मराठीसह इंग्रजी माध्यमातून करता येते. संगीत, योगा, नाट्य, इंग्रजी-हिंदी-मराठी साहित्य, संस्कृत, उर्दू. राज्यशास्र, समाजशास्त्र, इतिहास आदी विषय घेतले तर स्पर्घा परीक्षेची तयारीही करता येते.

वाणिज्य - बी.कॉम.मध्ये बँकिंग, इन्शुरन्स, अकाउंटन्सी, आॅडिटिंगसह स्पेशलाइज्ड
विषयात पदवीधरांना नोकरीची संधी वाढते.

टॉप 5 कोर्सेस
तज्ज्ञांनुसार - नोकरी, स्वयंरोजगार, उद्योग निर्मिती क्षमतेच्या कोर्सेसचा पर्याय
1. बी.व्होक.
बॅचलर ऑफ व्होकेशनल तीन वर्षांचा कोर्स आहे. ४० टक्के प्रॅक्टिकल, ६० टक्के थिअरी असते. उद्योगात अनुभवाची संधी. उद्योगही काढता येतो.

2. बी.एस्सी. इन ज्वेलरी डिझाइन अँड जेमाॅलाॅजी
सोने आणि रत्नांचे डिझाइन शिकवणारा तीन वर्षांचा कोर्स केला तर ज्वेलरी इंडस्ट्रीजमध्ये हमखास नोकरीची संधी वाढते.

3. माहिती तंत्रज्ञानशास्त्र
बी.एस्सी. संगणक किंवा माहिती तंत्रज्ञानशास्त्र, बीसीएची डिग्री केल्यास आयटी सेक्टर आणि सरकारी नोकरीची संधी मिळते. स्वतःच्या कंपनीची संधी वाढते.

4. बीबीए
बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन हा तीन वर्षांचा कोर्स आहे. कॉर्पाेरेट कंपन्यांमध्ये हमखास नोकरी मिळण्याची संधी या कोर्समुळे वाढू शकते.

5. बी.एस्सी. इन डेटा अॅनालिसिस
आयआयटी मद्रासला आहे. शंभर टक्के ऑनलाइन कोर्स आहे. कोणत्याही शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...