आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:पुण्यात 10 वर्षांच्या मुलीस पळवून नेऊन लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झोपडीमध्ये झोपलेल्या दहा वर्षाच्या मुलीस पळवून नेऊन लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्या प्रकरणी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. नयन लालू घोष( वय- 22 ,राहणार - बिबेवाडी, पुणे )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी आरोपीवर मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत पीडित मुलीच्या 32 वर्षे आईने आरोपी नवीन घोष यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या त्यांच्या मुलांसह बिबबेवाडी परिसरातील एका सोसायटीमध्ये झोपडीमध्ये झोपलेल्या होत्या.

12 मे रोजी रात्री साडेबारा वाजण्याचे सुमारास आरोपी नवीन घोष यानी झोपडीत बेकायदेशीर प्रवेश करून, तक्रारदार यांची दहा वर्षाची अल्पवयीन मुलगी हिला अनैतिक कृत्य करण्यासाठी पळून नेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत पुढील तपास मार्केटयार्ड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस कांबळे करत आहेत.

14 वर्षाच्या मुलीचा विनयभंग

14 वर्षाच्या मुलीचे एका तरुणा सोबत असलेले प्रेम संबंध न पटल्याने, सदर तरुणाच्या घरी मुलीची आई पालकांना समजावण्यासाठी गेली असताना, संबंधित तरुणानी मुलीच्या आईस व मुलीस अश्लील शिवीगाळ करून त्यांच्या शरीरास आक्षेपार्ह स्पर्श करून विनयभंग केला आहे. याप्रकरणी सनी संतोष भरगुडे (वय- 22 ,राहणार -बिबेवाडी ,पुणे )या आरोपी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास बिबबेवाडी पोलिस करत आहे.