आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:100 लोकांचा एका तरुणावार प्राणघातक हल्ला, कॅमेरात कैद झाली घटना; आतापर्यंत 10 जणांना अटक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व 100 जणांवर गुन्हा दाखल, यापैकी 90 पेक्षा अधिक लोक अज्ञात

पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील नेहरूनगरमध्ये 100 हल्लेखोरांनी एका युवकावर प्राणघातक हल्ला केला. त्याच्या घराच्या आसपास असलेल्या 10 गाड्यांची तोडफोड केली. हल्लेखोर तलवार, दांडुकं, बॅट, सिमेंटचे ब्लॉक, विटा-दगड घेऊन हल्ला करण्यासाठी गेले होते. शुक्रवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 10 लोकांना अटक केली आहे.

निलेश सुभाष जाधव (वय 35) असे हल्ल्यात जखमी युवकाचे नाव आहे. निलेशच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आशिष जगधने (31), इरफान शेख (30), जितेश मंजुळे (28),जावेद औटी (29), आकाश हजारे (30) यांसह सुमारे 100 लोकांवर पिंपरी पोलिस ठाण्यास गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील 90 पेक्षा अधिक लोक अज्ञात आहेत.

पिंपरी पोलिसांनुसार, निलेश जाधव यांचे नेहरुनगरमध्ये कार्यालय आहे. निलेश शुक्रवारी रात्री 9.30 वाजता कार्यालयासमोरील पार्क कारमध्ये लॅपटॉप ठेवण्यासाठी गेले होते. यादरम्यान कार आणि दुचाकीवरून 100 हल्लेखोर आले. निलेशला पाहताच आरोपींनी त्याला पिटाळले. आरोपी हत्यारांसह 'मारून टाका, त्याला संपवा' असे ओरडत त्याच्या मागे पळत होते.

तलवारीने पाठीवर तीन वेळा वार केले

या हल्ल्यात जाधव यांच्या पाठीवर तलवारीने दोन-तीन वेळा वार केले. मात्र जाधवने चपळाईने जीव वाचवत तेथून पळ काढला. जाधव यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या आरोपींनी अनेक तास या भागात फिरून लोकांना धमकावल्याचा आरोप करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस कमिशनर कृष्ण प्रकाश आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे स्थानिकांना आश्वासन दिले. या हल्लेखोरांनी निलेशवर हल्ला का केला याचा पोलिस तपास करत आहेत.