आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:‘नासा’त गुंतवणुकीचे आमिष दाखवून 100 जणांना सहा कोटी रुपयांचा गंडा

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंडगार्डन पोलिस ठाण्यात नागरिकांच्या तक्रारी, चौघांविरोधात गुन्हा

अमेरिकेतील अंतराळ संशोधन ‘नासा’च्या नावाने १०० जणांना ६ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी बंड गार्डन पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ‘राइस पुलर’ यंत्राच्या विक्रीतून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

राम गायकवाड (रा. अकलूज, जि. सोलापूर), रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ, राहुल जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बाबासाहेब नरहरी सोनवणे (५०, रा. शिवपार्वती सोसायटी, सातववाडीजवळ, गोंधळेनगर, हडपसर) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राइस पुलर यंत्राला मागणी असून यंत्राच्या खरेदीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे आमिष आरोपींनी दाखवले होते. स्टेशन परिसरातील एका हाॅटेलमध्ये आरोपींनी गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’तील प्रतिनिधी भारतात येणार आहेत. ‘नासा’चे शास्त्रज्ञ या यंत्राचे परीक्षण करणार असून राइस पुलर यंत्रावर ते संशोधन करणार आहेत. राइस पुलर या धातूच्या भांड्याला मागणी असल्याचे आरोपींनी गुंतवणूकदारांना सांगितले होते. बनावट कागदपत्रांद्वारे आरोपींनी नागरिकांकडून पैसे गोळा केले. दरम्यान, पोलिसांकडे या प्रकरणात फसवणूक झालेल्या १०० नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिले होते. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...