आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दहावीचा निकाल:​​​​​​​दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 95.30 टक्के, तर कोकण आघाडीवर, यंदाही मुलींचीच बाजी

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 98.77 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा आहे. औरंगाबादचा निकाल हा 92 टक्के इतका लागला. तसेच नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत 96.91 टक्के मुली, तर 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.

विभागनिहाय टक्केवारी

  • कोकण - 98.77 टक्के
  • पुणे - 97.34 टक्के
  • कोल्हापूर - 97.64 टक्के
  • मुंबई - 96.72 टक्के
  • अमरावती - 95.14 टक्के
  • नागपूर - 93.84 टक्के
  • नाशिक - 93.73 टक्के
  • लातूर - 93.09 टक्के
  • औरंगाबाद - 92 टक्के

हे लक्षात ठेवा :

गुरुवारपासून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन तसेच स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. गुण पडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान, तर छायाप्रतींसाठी 18 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.

या ऑनलाइन वेबसाइट्सवर निकाल उपलब्ध

> www.mahresult.nic.in (येथे निकालासोबतच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल)

> www.sscresult.mkcl.org

> www.maharashtraeducation.com

> www.mahahsscboard.in (येथे शाळांना एकत्रित निकाल मिळेल)