आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण:11 पोलिसांचे निलंबन, तर शाई फेकणाऱ्यावर गुन्‍हा दाखल

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी ११ जणांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. तर शाईफेक प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलसांकडून देण्यात आली. ताब्यात घेतलेल्या संशयितांना रविवारी मोरवाडी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १४ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, घोषणाबाजी, मानहानी प्रकरणी कलम ७ महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) १३५ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी अकरा पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिस्तभंग कारवाईनुसार ‘शासकीय सेवेतून निलंबित’ केल्याचे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पत्रकाराची अटक चुकीची...
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाई फेक प्रकरणी पत्रकार गोविंद वाकडे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे शाई फेकीचा व्हिडिओ कसा आला, त्यांना शाई फेकीच्या फेकिच्या घटनेची आधीच माहिती होती का, या कारणास्तव त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचा मोबाइल ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. मात्र, पत्रकार गोविंद वाकडे यांची अटक कायद्याला धरून नाही.

बातम्या आणखी आहेत...