आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात:12 जण जखमी, 4 गंभीर; दरीत कोसळणारा ट्रक मातीच्या ढिगाऱ्यात घातल्याने वाचले 40 वारकऱ्यांचे प्राण

पुणे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्याच्या उरुळी कांचन जवळील शिंदवणे घाटात सोमवारी वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रक घाटातील दुसऱ्या वळणावरुन जात असताना अचानक ट्रक चालकाला पुढे एक नादुरुस्त वाहन उभे असल्याचे दिसले. त्यामुळे त्याने प्रसंगावधान राखून ट्रक मातीच्या ढिगाऱ्यावर घातला. यामुळे 12 वारकरी बाहेर फेकले गेल्याने जखमी झाले. यातील 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे चालकाने प्रसंगावधान राखत दरीत कोसळणारा हा ट्रक ऐनवेळी मातीच्या ढिगाऱ्यावर घातल्यामुळे मोठी जिवितहाणी टळली.

चालकाचा आत्मविश्वास अन् प्रसंगावधान

ही घटना आज दुपारी चार वाजता शिंदवणे घाटात घडली. ​​​​​​ट्रकमध्ये चाळीस वारकरी होते, चालकाचा आत्मविश्वास आणि चाणाक्षपाणामुळे त्यांचे प्राण वाचल्याचे सांगण्यात आले आहे.

मातीत रुतून बसला ट्रक

साखरवाडी येथून सोमवारी दुपारी दोन वाजता आळंदीसाठी निघालेले 40 वारकरी घेऊन जाणाऱ्या ट्रकला शिंदवणे घाटात ड्रायव्हर पोपट बबनराव यादव (रा. सोळशी नायगाव ता. कोरेगाव जिल्हा सातारा ) यांना दुसऱ्या वळणावर ट्रकचा (एम. एच. 12, बी. टी. 4362 ) ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी एका मोठ्या मातीच्या ढिगाऱ्यावर ट्रक घातला जेणे करून ट्रकचा मागील भाग मातीत रुतून बसेल आणि तसेच झाले.

वारकरी रस्त्यावर कोसळले

ट्रक अर्धा बाहेर व अर्धा मातीत रुतल्यामुळे गाडीला जोरात धक्का बसल्यामुळे कँबीन मधील वारकरी पंचवीस फुट खाली रस्त्यावर पडले व आतील वारकरी जखमी झाले. त्यामध्ये 12 वारकरी जखमी झाले असून उरुळी कांचन येथे सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये त्यांना दाखल केले आहे.

चौघांची प्रकृती चिंताजनक

ट्रकच्या केबिन वर बसलेले बसलेले सात ते आठ वारकरी खाली पडले व ट्रक मधील आतील वारकरी आतील सामानावर पडून गंभीर जखमी झाले.ट्रकला अपघात झाल्याचे कळताच ऊरुळी कांचन येथील स्थानिकांनी वारकऱ्यांना बाहेर काढुन त्यांना ॲम्बुलन्स मधून हॉस्पिटलमध्ये नेण्यास मदत केली.

बातम्या आणखी आहेत...