आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • 12 Lakh Fraud From Three People With The Lure Of Job In Pune, Amish Pretended To Be Employed In Military Engineer Service; Arrested One

नोकरीच्या आमिषाने अनेकांना गंडा:मिल्ट्री इंजिनिअर सर्व्हिसमध्ये नोकरीचे दाखवत तरुणाची 12 लाखांचा फसवणूक; एक अटकेत

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील खडकी अ‍ॅम्युनेशन फॅक्टरीत मिल्ट्री इंजिनिअर सर्व्हिसेसमध्ये नाेकरीस लावून देण्याचे अमिष दाखवून काेल्हापूर येथील एका तरुणासह इतरांची एकूण 12 लाख 29 हजार रुपयांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी तीन आराेपींवर खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांनी बुधवारी दिली आहे.

संदीप कुमार शर्मा (रा.कसबा पेठ,पुणे) या आराेपीस अटक करण्यात आली असून त्याचे इतर दाेन साथीदारांवर ही पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विशाल शिवानंद शिंदे (वय-19,रा.नगर कळंबा, ता.करविर, काेल्हापूर) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार ऑगस्ट 2022 ते आतापर्यंत घडलेला आहे. आराेपी रवी याने तक्रारदार विशाल शिंदे यांना मिल्ट्री इंजिनिअर सर्व्हिसेसमध्ये नाेकरीस लावून देण्याचे अमिष दाखवले. त्यानुसार आराेपीने त्याचे फाेन पे वर तक्रारदार यास सुरवातीला 60 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. तक्रारदार यांचे ओळखीचे हदाईतुल्ला गुलाब मनेर यांचे व्हाॅटसअपवर आधारकार्ड, मार्कशीट अशी कागदपत्रे पाठवुन आराेपीने इतर आराेपींचे मदतीने तक्रारदार यांना कमांड हाॅस्पीटल पुणे येथे मेडिकल केल्याचा बनाव केला. ऑक्टाेबर 2022 मध्ये तक्रारदार व इतरांना त्यांचे नावाचे बनावट मिल्ट्री इंजिनिअर सर्व्हिसेस (डिफेन्स) टेम्प्रररी पास वर सही, शिक्क्याचे आयकार्ड व सर्व्हिस बुक देऊन नाेकरीचे काम झाल्याचे व लवकरच जाॅईनिंग लेटर मिळेल असे सांगुन बाकीचे पैसे भरण्यास सांगितले.

त्याप्रमाणे तक्रारदार विशाल शिंदे यांचेकडून पाच लाख 79 हजार रुपये व इतर जणांकडून सहा लाख 50 हजार रुपये घेऊन त्यांना काेणत्याही प्रकारे नाेकरी न देता तसेच त्यांचे पैसे परत न करता आराेपींनी फसवणुक केली आहे. याबाबत खडकी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस मगदुम पुढील तपास करतात.

गाडी खरेदीच्या बहाण्याने भामटयाने कार पळवली

पुण्यातील नाना पेठ येथे नवीद जैनुद्दीन शेख (वय-27) यांचा जुनी चारचाकी कार खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. 21 नाेव्हेंबर राेजी त्यांचेकडील चारचाकी कार हाेंडा अ‍ॅकाॅर्ड (एमएच 14 वीके 7191) ही खरेदी करण्याचे बहाण्याने इशांत शर्मा (पूर्ण नाव व पत्ता नाही) हा व्यक्ती आला. त्याने कार खरेदीच्या बहाण्याने दाेन लाख 90 हजार रुपयांचा युनियन बँक ऑफ इंडिया शाखा विश्रांतवाडी,पुणे याचा चेक देवून तक्रारदार यांचेकडे विनवणी करुन गाडी म्मीला दाखवून आणताे असे म्हणाला.

त्यानुसार तक्रारदार यांनी आराेपी साेबत त्यांचे भावास पाठवले असता, आराेपीने तक्रारदार यांचे भावास पुणे विद्यापीठ गेटवर कार मधुन उतरवून पाच मिनिटात आले असे म्हणून कारसह पसार झाला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात आराेपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...