आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाईल चोरी:पुण्यातील आंबा महोत्सवातून व्यापाऱ्यांचे 12 मोबाइल चोरीला

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील मार्केट यार्डातील आंबा महोत्सवातून व्यावसायिकांचे १२ मोबाइल चोरून नेल्याची घटना आठ ते नऊ एप्रिलदरम्यान घडली आहे. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास आंबा व्यावसायिक झोपल्याची संधी साधून मोबाइल चोरल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी अक्षय थोटम (२७ रा. हुशी, देवगड, सिंधुदुर्ग) यांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आंबा महोत्सवात अक्षयसह अनेकांनी आंबा विक्रीचे स्टॉल लावले हाेते. ८ ते ९ एप्रिलला मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गाढ झाेपलेल्या अक्षयसह इतरांचे १२ मोबाइल चोरून नेले.