आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) दुसऱ्या टप्प्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत ‘हागणदारी मुक्त अधिक’ निकषांची पूर्तता केलेली 129 गावांची नावे जाहीर केली जाणार आहेत. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ वर्षानिमित्त स्वातंत्र्यदिनी ‘हगणदारी मुक्त अधिक’ घोषित करण्यात येणार आहेत.
सन 2021-22 मध्ये जिल्ह्यातील 315 गावे हगणदारी मुक्त अधिक घोषित करण्यात आली असून उर्वरित गावे मार्च 2023 पर्यंत ‘ओडीएफ प्लस’ घोषित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम मोहीम स्वरूपात करुन कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत कौटुंबिक आणि सार्वजनिक ठिकाणी शोषखड्डे मनरेगा अंतर्गत बांधण्यात आले आहेत.
129 गावे ‘ओडीएफ प्लस’
बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, मावळ, मुळशी व पुरंदर तालुक्यातील प्रत्येकी 10, जुन्नर 12, खेड 14, शिरूर 15, वेल्हा 8 अशी 13 तालुक्यातील एकूण 129 गावे ‘ओडीएफ प्लस’ घोषित करण्यात येणार आहेत. यासाठी गाव पातळीवर वैयक्तिक शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे, गावातील सर्व संस्थात्मक ठिकाणी शौचालयाची सुविधा निर्माण करणे. शाळा, अंगणवाडी येथे शौचालयाची उभारणी करून त्याचा वापर करणे.
ग्रामसभेत चर्चा करून ठराव
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण करून सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत शोषखड्डा व इतर कामे पूर्ण करून गावे हगणदारीमुक्त अधिक करण्याचे नियोजन करण्यात करण्यात आले आहे. हगणदारीमुक्त अधिकच्या निकषांची पूर्तता संबंधित गावांनी करून घ्यावी व ग्रामसभेत या विषयावर चर्चा करून ठराव करण्याचे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.