आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Pune
 • 12th Student Parliament Organized By MIT From 15th To 17th September With Participation Of 29 States, 450 Universities And 30 Thousand Students.

एमआयटी तर्फे बारावी छात्र संसद 15 ते 17 सप्टेंबरला:देशातील 29 राज्ये, 450 विद्यापीठे आणि 30 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे21 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १२व्या भारतीय छात्र संसदेचे आयोजन १५ ते १७ सप्टेंबर २०२२ दरम्यान स्वामी विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे आयोजन केले आहे. सन २०११ पासून दरवर्षी या छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून, छात्र संसदेचे हे बारावे वर्ष आहे.

बाराव्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होईल व समारोप १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता होईल.

तीन दिवस चालणार्‍या या छात्र संसदेत भारत सरकारच्या कायदा आणि न्याय राज्यमंत्री एस.पी. सिंह बघेल, जे.के. उद्योग समूहाचे सीईओ आणि आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष अनंत सिंघानिया, पर्यावरणवादी, हरित कार्यकर्ता आणि हिमालयन पर्यावरण अभ्यासक आणि संवर्धन संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. अनिल प्रकाश जोशी, इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. कैलासवादिवू सिवन, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रीमती कौशिकी चक्रवर्ती, प्रसिद्ध अभिनेत्री व राज्यसभेच्या माजी खासदार रूपा गांगुली, सीबीआयचे माजी संचालक, डी. आर. कार्तिकेयन, आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता व राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा, प्रख्यात पत्रकार, राजकीय भाष्यकार श्री रशीद किडवाई यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.

जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, श्री. तुषार गांधी, प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, अनू आगा, अभय फिरोदिया, जस्टिस एन. संतोष हेगडे, लोबसांग सांग्ये, मार्क टूली, डॉ. विजय भटकर हे या छात्रसंसदेचे मार्गदर्शक आहेत. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे या छात्र संसदेचे संस्थापक आहेत.

छात्र संसदेतील सत्रे अशी

 • भाषण स्वातंत्र्य-लक्ष्मण रेषा कोठे?
 • घराणेशाही- प्रत्येक राजकीय पक्षाचे कटू सत्य ?
 • लोकशाही आणि कॉर्पोरेटशाही- सत्ता कोणाकडेे?
 • कमी भारतीय अधिक पाश्चत्य ः भारतीय चित्रपटाचे बदलते स्वरूप
 • भारतीय माध्यमांवर गोंगाटाचे की कायद्याचे राज्य?
 • समान नागरी संहितेची वेळ आली आहे का ?
 • याशिवाय विशेष अशा दोन ‘नेटवर्किंग’ सत्रांचेही आयोजन
 1. देशभरातील वेगवेगळ्या महाविद्यालयांतून १० हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी
 2. २९ राज्यांतील ४५० विद्यापीठांतील ३० हजार महाविद्यालयातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात क्रियाशील विद्यार्थ्यांचा थेट सहभाग.
बातम्या आणखी आहेत...