आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • 13 Pistols Seized From Jadhav's Gang; Producer Karan Johar Was Also To Be Threatened By The Lawrence Bishnoi Gang For Ransom |marathi News

जाधवच्या टोळीकडून 13 पिस्तुले जप्त:लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून निर्माता करण जोहरलाही दिली जाणार होती खंडणीसाठी धमकी

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आणि ओंकार बाणखेले खून प्रकरणात अटकेत असलेला मुख्य आरोपी संतोष जाधव याच्या टोळीतील सात जणांना व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून १३ पिस्तुले, आठ मोबाइल, एक बुलेट कॅरिअर, एक मॅक्झिन आणि एक चारचाकी गाडी जप्त करण्यात आली. कुख्यात लाॅरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित संतोष जाधवने यापैकी दोन आरोपींना मध्य प्रदेशातील मनवर येथे गावठी पिस्तुलांचा साठा आणण्यासाठी पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

जीवनसिंग नहार (२३, रा. मंचर), श्रीराम थोरात (३२, रा. मंचर), जयेश बहिराम (२४, रा. घोडेगाव), वैभव ऊर्फ भोला तिटकारे (१९, रा. जळकेवाडी, चिखली), रोहित तिटकारे (२४, रा. सरेवाडी, नायफड), सचिन तिटकारे (२२, रा. धाबेवाडी, नायफड), जिशान इलाईबक्ष मुंढे (२०, रा. घोडेगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. संतोष जाधवसह या आरोपींविरोधात नारायणगाव पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत नारायणगावमधील इंदिरानगर येथील वॉटर प्लँट व्यावसायिकाने तक्रार दिली असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात पोलिसांनी नहार आणि थोरातला अटक केली. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या दोघांकडे केलेल्या तपासात संतोष जाधव याने जयेश बहिराम व एकाला मध्य प्रदेशातील मनवर येथे गावठी पिस्तुलांचा साठा आणण्यासाठी पाठवले होते. त्यातील काही पिस्तुले पुढे हरियाणाला पाठवण्याचे नियोजन होते अशी माहिती समोर आली.

करण जोहर होता महाकाळच्या यादीत
सौरभ महाकाळ हा लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सदस्य आहे. सलमान खानला पाठवलेल्या धमकी पत्राबाबत त्याला पूर्वकल्पना होती आणि संशयितांची नावे माहिती असल्याची बाब चौकशीत उघडकीस आली होती. दरम्यान, करण जोहर यालाही लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी देऊन पाच कोटी खंडणीची मागणी केली जाणार होती, असेही चौकशीत समोर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...