आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:अट्टल वाहनचोराकडून 6 लाखांची 13 वाहने जप्त

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे, मुंबई, सांगली, अहमदनगर, नागपूर येथून दुचाकी चोरणाऱ्या विनाेद आनंद कांबळे (३०,रा.पिंपळे गुरव,पुणे) या आरोपीस अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले. त्याच्या ताब्यातून ६ लाख रुपयांची १३ वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी दिली. आरोपी पुण्यातील विमान नगर परिसरात खुळेवाडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पाेलिस निरीक्षक गणेश माने यांच्या पथकाने रस्त्यावर सापळा रचून आरोपी विनाेद कांबळे यास दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर दुचाकी हडपसर भागातून चोरी केल्याची कबुली दिली.

बातम्या आणखी आहेत...