आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 वर्षीय पुतणीचे अपहरण करुन अत्याचाराचा प्रयत्न:भावाच्या कुटुंबीयांवर हल्ला करत मुलीला जाळण्याचा प्रयत्न

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भावजयीच्या बहिणीच्या मुलाने आरोपीच्या मुलीला लग्नाच्या आमिषाने पळवून नेल्याच्या रागातून घरात घुसून तिच्यासहीत कुटुंबीयांना मारहाण करण्यात आलीय. इतकेच नाही तर तिचा विनयभंग करत 13 वर्षीय पुतणीला अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात 8 जनावर गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी सकाळी पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

सूर्यकांत नामदेव चव्हाण (वय 35), शीतल सूर्यकांत चव्हाण (वय 33), दत्ता अशोक भिंगारदिवे (वय 38), महादेव अशोक भिंगारदिवे (वय 34), चंदा अशोक भिंगारदिवे (वय 60), तंबी दत्त भिंगारदिवे (वय 40), महादेव आणि दत्ता यांचे इतर तीन आरोपी यांच्यावर दरोडा, अपहरण आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुण्यातील खडकी येथे घडली. कृष्ण मंदिराजवळ नाईक चाळ येथून मुलीचे अपहरण करून इंदापूरला नेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मुलगी पळून गेल्याचा राग धरला

पोलिसांनी दीलेल्या माहितीनुसार प्रकरणी, पीडित मुलीच्या आईने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 15 मार्च 2022 16 मार्च 2022 या दरम्यान घडली आहे. आरोपी सूर्यकांत आणि पीडित मुलीची आई हे दीर-भावजयी आहेत. आरोपी सूर्यकांत यांची मुलगी फिर्यादीच्या बहिणीच्या मुलासोबत काही दिवसांपूर्वी पळून गेली होती. याचा राग सूर्यकांत याच्या मनात होता. यामुळे आपल्या नातेवाईकांसह फिर्यादीच्या घरात आरोपी घुसले. फिर्यादी तसेच त्यांच्या घरच्यांशी त्यांनी हुज्जत घातली.

अत्याचार-जाळण्याचा प्रयत्न

यावेळी त्यांच्या घरातील साहित्याची तोडफोड केली. एवढेच नाही तर फिर्यादींचा विनयभंग करत त्यांचे मोबाइल हिसकवून घेत घरातील 20 ते 25 हजार रुपये चोरले. तसेच घरातील अल्पवयीन मुलीस त्यांच्या समोरच जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेत तिचे अपहरण करण्यात आले. इंदापूर याठिकाणी नेऊन तिला मारहाण केली. यावेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. आरोपींनी मुलीच्या अंगावर पेट्रोल ओतत तिला जाळण्याचाही प्रयत्न केला.

फोन आल्यानंतर सोडले

या संपूर्ण प्रकारा दरम्यान कुणाचा तरी फोन आल्याने त्यांनी मुलीला सोडले. मुलीला इंदापूर येथून गाडीत आणत खडकी येथील पोलिस ठण्यासामोरील रणगाड्याजवळ सोडण्यात आले.यानंतर याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...