आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आत्महत्या:टीव्ही पाहण्यावरून रागावल्याने सातवीच्या मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या, बिबडेवाडीतील आदर्श चाळीतील घटना

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिवस रात्र कार्टून पाहायचा, आईने रागावल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
Advertisement
Advertisement

कार्टून पाहू न दिल्याने एका तेरा वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बिबवेवाडी येथे बुधवारी समोर आला आहे. आदर्श चॉलमध्ये आपल्या आई आणि बहिणीसोबत राहणाऱ्या या मुलाला दिवसरात्र कार्टून पाहण्याचे वेड लागले होते. आईने त्याला कार्टून पाहण्यापासून रोखले आणि त्याच रागात त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने आपल्या राहत्या घरी मंगळवारी दुपारी एका स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

दिवसरात्र कार्टून पाहायचा...

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, त्याने नुकताच सातवीच्या वर्गात प्रवेश केला होता. तो मंगळवारी सकाळ पासूनच कार्टून पाहत होता. कुटुंबियांनी अनेक वेळा सांगून सुद्धा तो नेहमीच दुर्लक्ष करायचा. शेवटी मंगळवारीच त्याच्या आईने मुलाला कार्टून पाहण्यावरून खूप रागावले. तसेच घरातील टीव्ही बंद करून बाहेर गेली. यानंतर मुलगा सुद्धा रागात वरच्या फ्लोअरला गेला. मंगळवारी दुपारी बहीण काही कामानिमित्त वरच्या मजल्यावर गेली. तेव्हा आतील दृश्य पाहून ती चक्रावली. तिने आपल्या आई आणि शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. कुटुंबियांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात हलवून पुढील कारवाई करण्यात आली.

Advertisement
0