आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बायकाॅईन’ अ‌ॅप डाऊनलाेड करणे अंगलट:नफा मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची 13.50 लाखांची फसवणूक

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका तरुणाला ‘बायकाॅईन’ हे अ‌ॅप डाऊनलाेड करण्यास लावून त्या अ‌ॅपवर झालेला नफा काढण्यासाठी वेळाेवेळी पैसे भरायला लावले. त्यानंतर तब्बल 13 लाख 67 हजार रुपयांची फसवणुक केली.

याप्रकरणी राकेश ईश्वरदास लाेहार (वय 38, रा. यमुनानगर, पुणे) या तरुणाने वेगवेगळे तीन अज्ञात माेबाईल धारक आणि बायकाॅईन अ‌ॅप बनविणाऱ्या व्यक्तीविराेधात निगडी पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारदार राकेश लाेहार व्यावसायिक म्हणून काम करत असून त्यांना अनाेळखी माेबाईल क्रमांकावरुन व्हा‌ॅटसअपद्वारे सुरुवातीला आठ एप्रिलला संर्पक साधण्यात आला. त्यानंतर तीन मेपर्यंत भामट्यांनी वेगवेगळया तीन माेबाईल क्रमांकावरुन त्यांच्याशी संर्पक साधत बिटकाॅईन ट्रेडिंग मध्ये गुंतवणुक केल्यास चांगल्याप्रकारे नफा मिळेल असे आमिष दाखवले. त्यासाठी तक्रारदार यांच्या माेबाईलवर संशयितांनी एक लिंक पाठवली. त्या वेबासाईटवर तक्रारदार यांची वैयक्तिक माहिती भरण्यास सांगण्यात आले. तसेच ‘बायकाॅईन’ डाऊनलाेड करण्यास भाग पाडून त्या अ‌ॅपवर बिटकाॅईन ट्रेडिंग मधून झालेला नफा काढण्यासाठी वेळाेवेळी पैसे भरण्यास भाग पाडले. यानंतर तक्रारदारांची एकूण 13 लाख 67 हजार रुपयांची फसवणुक करण्यात आली. याबाबत पुढील तपास निगडी पाेलिस ठाण्याचे निरीक्षक विश्वजीत खुळे करीत आहेत.

नाेकरीच्या आमिषाने 46 हजारांची गंडा

पुणे शहरा जवळील वाघाेलीत राहणाऱ्या अरुण वामनराव ढवळे (वय 46) यांना अनाेळखी दाेन माेबाईल क्रमांकावरुन भामट्यांनी फोन केला. त्याने चांगल्या पगाराची नाेकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांची माहिती ‘संभव-पे’ या लिंकवर भरायला सांगितली.

यानंतर 46 हजार रुपये ऑनलाइन 10 ते 20 मे यादरम्यान घेतले. परंतु ढवळे यांना नाेकरीस न लावता पैसेही परत केले नाही. त्यांची 46 हजार रुपयांची फसवणुक केली. याप्रकरणी लाेणीकंद पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक गजानन पवार करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...