आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयुष्मान भारत योजनेतून राष्ट्रीय आरोग्य अभिया अभियाना अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्रात समुदाय व आरोग्य अधिकारी यांची १४०६ पदे रिक्त आहेत. ती लवकरच भरण्यात येतील, अशी ग्वाही आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी यांनी दिली. त्यामुळे राज्यातील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल, असे ते म्हणाले.
डॉ. सावंत म्हणाले, ‘ केंद्र शासनाने राज्यात डिसेंबर २०२२ पर्यंत १०३५६ आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्याचे लक्ष दिले होते. राज्याने आतापर्यंत ८३३० उपकेंद्र, १८६२ प्राथमिक व ५८२ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अशी १०७७४ केंद्र कार्यान्वित केली आहेत. या उपकेंद्राद्वारे ५ हजार लोकसंख्येला आरोग्यवर्धिनी केंद्राचा लाभ दिला जात असून याद्वारे १३ प्रकारच्या सेवा रुग्णांना दिल्या जात आहेत. यात प्रामुख्याने प्रसुती पूर्व, प्रसूती सेवा नवजात बालकांना सेवा, बाल व किशोरवयीन आजार व लसीकरण, कुटुंब नियोजन गर्भनिरोधक आवश्यक सेवा, सामान्य रोगाची बाह्य रुग्ण सेवा, संसर्गजन्य रोग नियोजन, असंसर्गजन्य रोग व तपासणी ,मानसिक आरोग्य नियोजन ,कान, नाक, घसा डोळे व सामान्य आजार संबंधीच्या सेवा, दंत मुखरोग आरोग्य, वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार, प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा, आयुष व योग अशा सेवांचा समावेश आहे . आता प्रत्येक आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर आयुर्वेदिक, युनानी, बीएससी नर्सिंग पदवीधारक नियुक्त केले जात आहेत. त्यांच्याद्वारे या सुविधा तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही डॉ. सावंत म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.