आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमावबंदीचे आदेश:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यानंतर मुंबईतही कलम 144 लागू; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोनाच्या प्रकरणात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे, राज्य सरकार घरीच राहून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करीत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरपर्यंत 144 कलम लावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमणार नाहीत असे आदेश लागू केले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तलयाकडून यासंदर्भातील सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सव काळातील संभाव्य गर्दी टाळण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यात देखील जमावबंदीचे आदेश लागू
दरम्यान, पुण्यातही जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. पुण्यात 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू असेल अशी माहित पुणे शहर पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे. तसेच या दरम्यान कोणीही नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले.

यावर राहणार सक्त मनाई
या आदेशानुसार, पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सर्व हा आदेश लागू असणार आहे. दरम्यान, ज्वालाग्रही पदार्थाच्या सहाय्याने आग निर्माण करणाऱ्या घटनेवर बंदी असेल. यामध्ये रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस इत्यादीचा समावेश आहे. तसेच सर्व गणेश मंडळांना कोरोना नियमांचे पालन करत गणेशत्सव साजरा करावा लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...