आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात नोकरीच्या नावाने 15 जणांची फसवणूक:परदेशात नोकरीच्या लावून देतो म्हणत 32 लाखांचा गंडा

पुणे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई, कॅनडा अशा परदेशातील वेगवेगळया कंपनीत चांगल्या प्रकारची नाेकरी लावून देताे असे अमिष दाखवून 15 जणांची एकूण 32 लाख 62 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार आराेपींवर पुण्यातील लष्कर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.

कुसुम संदीप गायकवाड, वनराज ऊर्फ पुष्कराज बाटे, अभिजीत राजेंद्र दळवी, अब्दुल राैफ उमर (सर्व रा.पुणे) या आराेपींवर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी प्रशांत रमेश बापट (वय-33,रा.घाेरपडी,पुणे) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे. सदरचा प्रकार मार्च 2022 ते आतापर्यंत घडलेला आहे. तक्रारदार प्रशांत बापट हे परदेशात नाेकरी शाेधत हाेते. जस्ट डाईलवरुन त्यांनी वर्ल्ड ट्रव्हलसचे कुसुम गायकवाड यांचा नंबर घेऊन त्यांच्याशी संर्पक साधला. तक्रारदार यांना परदेशात चांगल्या कंपनीत माेठया पगाराची नाेकरी लावून देताे असे अमिष आराेपींनी दाखवून त्यांच्याकडून वेळाेवेळी दहा लाख 58 हजार रुपये घेतले. तर, अशाचप्रकारे सतर 14 जणांकडून 22 लाख चार हजार रुपये असे मिळून एकूण 32 लाख 62 हजार रुपये घेऊन काेणासही नाेकरीस न लावता किंवा परदेशात न पाठवता त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रियांका शेळके करत आहे.

गुंतवणुकीच्या अमिषाने सहा लाखांना गंडा

चेन मार्केटिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगल्या प्रकारे परतावा मिळेल असे अमिष दाखवून एका तरुणीची सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात 30 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार एप्रिल 2022 ते आजपर्यंत घडलेला आहे.

त्यानुसार सुरेंद्र काळबांडे या आराेपीस पोलिसांनी अटक करुन त्याच्यासह हर्षल गायकवाड, प्रियांशी अजमेरा आणि क्यु नेट कंपनीचे इतर लाेक यांचेवर गुन्हा दाखल केला आहे. आराेपींनी त्यांचे डायरेक्ट सेलिंग मल्टी लेवल मार्केटिंग चेन मार्केटींग असलेली कंपनी क्यु नेट या कंपनीत गुंतवणुक केल्यास, खुप पैसे मिळतात असे सांगून माेठी स्वप्ने दाखवून सहा लाख रुपये भरण्यास प्रेरित करुन तिच्यासह इतर लाेकांची दिशाभुल करुन आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...