आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:सराईत चोरांकडून 15 वाहने जप्त

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध ठिकाणांवरून वाहनचोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून ३ लाख रुपये किमतीची एकूण १५ वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती सहायक पाेलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांनी दिली आहे. याप्रकरणी नीलेश बाळासाहेब शिवरकर (३३, रा. आळंदी, ता. हवेली, पुणे) व प्रशांत संपत चव्हाण (३४, रा.निमगाव म्हाळुंगी, ता.शिरूर, पुणे) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. लाेणीकंद पाेलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या वाहनचोरीच्या गुन्हाचा तपास युनिट सहाचे पथक करत होते. त्यावेळी सदर गुन्हयातील आरोपी वाघाेली बाजारतळ याठिकाणी येणार असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यानुसार निरीक्षक गणेश माने यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी नीलेश व प्रशांतला ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...