आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:पुण्यात 17 पिस्तुलांसह 13 जिवंत काडतुसे जप्त

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट सहा आणि युनिट एकच्या पथकाने विविध दोन कारवायांमध्ये गावठी पिस्तूल विक्री करणारे सात सराईत आरोपी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून २३ लाख ८१ हजार रुपये किमतीची गावठी बनावटीची १७ पिस्तुले आणि १३ जिवंत काडतुसे तसेच एक महिंद्रा कार, मोबाइल असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पुणे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे.

याप्रकरणी हनुमंत अशोक गोल्हार (२४, रा.जवळवाडी, ता.पाथर्डी), प्रदीप विष्णू गायकवाड (२५, रा. पाथर्डी, मु. रा. बीड), शुभम विश्वनाथ गर्जे (२५, रा. वडुले, ता. नेवासा), ऋषिकेश सुधाकर वाघ (२५, रा. सोनई, अहमदनगर), अमोल भाऊसाहेब शिंदे (२५, रा. घडले परमानंद, ता. नेवासा, अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक पेट्रोलिंग करताना पिस्तूल विक्री करणारे दोन एजंट वाघोली परिसरातील नानाश्री लॉज या ठिकाणी आल्याची माहिती मिळाली होती.

बातम्या आणखी आहेत...