आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास:मुलाच्या त्रासामुळे 17 वर्षांच्या युवतीची आत्महत्या ; तपासातून घटना उघडकीस

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरी जाण्या-येण्याच्या मार्गावर पाठलाग करून त्रास दिला जात असल्याने एका १२ वीत शिकणाऱ्या १७ वर्षांच्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी दोन महिने केलेल्या तपासातून ही घटना उघडकीस आली असून मुंढवा येथील एका १७ वर्षाच्या मुलावर आत्महत्येस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत या मुलीच्या वडिलांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना चंदननगरमधील युवतीच्या घरी १२ ऑक्टोबर रोजी घडली होती. माहितीनुसार, ही युवती केंद्रीय विद्यालयात १२ वीमध्ये शिकत होती. शाळेतून येत जात असताना एक १७ वर्षांचा मुलगा तिचा जुलैपासून पाठलाग करत होता. तिला वाटेत अडवून मैत्री करण्याची जबरदस्ती करून तिला त्रास देत होता. त्यामुळे कंटाळून युवतीने गळफास घेतला.

बातम्या आणखी आहेत...