आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • 18 Lakhs Compensation By Opening The Door Of Closed Flat; Chatu: A Case Has Been Registered Against The Suspect In Shringi Police Station

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ:बंद फ्लॅटचे दार उघडून 18 लाखांचा ऐवज लंपास; चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील घर‌फोड्यांचे सत्र कायम असून, चोरट्यांनी बाणेर रस्त्यावरील बहुमजली इमारतीमधील बंद फ्लॅट फोडून तब्बल 18 लाखांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

घराला कुलूप लावणे पडले महागात

तक्रारदार हे बाणेर रोडवरील एल्जीयन सोसायटीत राहतात. ते कुटूंबासह शनिवारी घराला कुलूप लावून गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी घराचा दरावाजा तोडून आत प्रवेश केला. तर लाकडी कपाटातील तब्बल 17 लाख 92 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तक्रारदार मंगळवारी परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लागेचच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानतंर पोलिसांनी येथे धाव घेत पाहणी केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढला जात आहे. परंतु, त्यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. तर, यासोबतच रास्ता पेठेतील बंद मेडिकलचे दुकान फोडून चोरट्यांनी तीन मोबाईल व रोकड चोरून नेली. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात अजित भोसले (वय 44) यांनी तक्रार केली आहे. तक्रारदारांचे मेडिकलचे दुकान आहे. मध्यरात्री चोरट्यांनी बंद मेडिकलच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, रोकड, 3 मोबाईल आणि चार्जर चोरून नेला.

बंगले खरेदी करण्याच्या बहाण्याने फसवणुक

पुण्यातील वानवडी परिसरात राहणाऱ्या संजय मुरलीधर बजाज (वय-६२) यांचे घोरपडी भागात हयसिंदा सोसायटी येथे दोन बंगले आहे. बंगले खरेदी करण्याच्या बहाण्याने गजेंद्र संचेती, गीतेश संचेती, सुनिल भुजबळ, जितेंद्र जस्वाल, त्रेजा गिल ( सर्व रा,पुणे) या आरोपींनी संगनमताने कट रचला. बजाज यांना बंगला खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून बंगल्याची कागदपत्रे घेऊन त्यावर बनावट सहया करुन आधारकार्ड, पॅनकार्ड यात छेडाछाड करुन बनावट दस्त तयार केले. बजाज यांचे ऐवजी तोतया इसम उभा करुन त्यांचे मालमत्तेची बेकायदशीररित्या परस्पर विक्री करुन तसेच त्यांचे नावे जनता सहकारी बँकेत खाते उघडून पीएनबी हाऊसिंग फायनान्स, मुंबई शाखेकडून दोन कोटी कर्ज घेवून आणि त्यांचे मालमत्तेच्या लाईट बीलावर गजेंद्र संचेती याने त्याचे नाव लावून फसवणुक केली आहे. याबाबत पुढील तपास वानवडी पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...