आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे जिल्हा परिषदेत नोकरीचे आमिष:सात जणांची 18 लाख रुपयांची फसवणूक; पोलिसांकडून आरोपीला अटक

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्हा परिषदेत परिचर व ड्रायव्हर म्हणून नोकरी लावतो असे आमिष दाखवत तब्बल 7 जणांकडून 18 लाख रुपये घेत त्यांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका लष्करतून निवृत्त झालेल्या एकाला अटक केली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नामदेव कान्हु जायभाये (वय ५७, रा. एअर फोर्स स्टेशन,पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जायभाये हा लष्करातून निवृत्त झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबाजोगाई येथील गंगाधर नारायण घुले या ६० वर्षीय वृद्धाने विमान नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा फसवणुकीचा प्रकार एअर फोर्स चौकात मार्च ते एप्रिल २०१३ दरम्यान घडला.

फिर्यादी घुले यांच्या यांचा जावई लष्करामध्ये आहे. तो लष्कराच्या दक्षिण मुख्यालयात रुजू झाला होता. २०१३ मध्ये त्यांची नामदेव जायभाये याच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी जेबहे जायभाय हा एअर फोर्स ईटेलिजन्स स्कुल येथे काम करीत होता. जायभाये याच्या ओळखीने मुलांना नोकरी लावतो, असे त्यांना समजले. त्याने घुले यांना पुणे जिल्हा परिषदेत परीचर, ड्रायव्हर व इतर जागा निघाल्या आहेत. त्यासाठी कागदपत्र आणून दिल्यास ड्रायव्हरसाठी अडीच लाख परीचरसाठी ३ लाख द्यावे लागेल असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी त्यांचा मुलगा व इतर ६ नातेवाईकांना नोकरी लावण्यासाठी असे एकूण १८ लाख रुपये जायभाये याला दिले.

दरम्यान काही दिवस गेले, यावेळी फिर्यादी यांनी जायभाय यांना नोकरी कधी मिळेल अशी विचारणा केली. मात्र तो टाळाटाळ करू लागला. घुले यांनी त्याला रक्कम परत मागीतली. जायभय याने घुले यांना १८ लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, पैसे नसल्याने तो वटला नाही. दरम्यान घुले हे त्यांच्या पैसे परत घेण्यासाठी मागे लागले. आरोपीने त्यांना १ लाख ३७ हजार रुपये परत केले. मात्र, उरलेले पैसे परत केले नाहीत. उलट आरोपीने आपल्याला दारू पाजून पाजून चेक घेतले अशी नोटीस पाठवली. त्यानंतर त्यांनी आता पोलिसांकडे फिर्यादी दिली असून सहायक पोलीस निरीक्षक लहाने तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...