आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांवर गुन्हा दाखल:बंद फ्लॅट फोडून 18 लाखांचा ऐवज लंपास

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बाणेर रस्त्यावरील बहुमजली इमारतीमधील बंद फ्लॅट फोडून तब्बल १८ लाखांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे बाणेर रोडवरील एल्जीयन सोसायटीत राहतात. ते शनिवारी बाहेर गेले असता चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तर लाकडी कपाटातील तब्बल १७ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तक्रारदार मंगळवारी परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढत आहेत.

बातम्या आणखी आहेत...