आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साखर कारखाना:राज्यातील 37 कारखान्यांच्या 1800 कोटींच्या कर्जास थकहमीचा निर्णय

सांगली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • साखर कारखानदारीसमोरील अडचणींच्या चर्चेसाठी ही मोठी बैठक झाली.

ज्या साखर कारखान्यांची कर्ज उभारणीची मर्यादा संपली आहे अशा राज्यातील ३७ कारखान्यांच्या १८०० कोटींच्या नवीन कर्जास थकहमी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत झाली.

साखर कारखानदारीसमोरील अडचणींच्या चर्चेसाठी ही मोठी बैठक झाली. त्यास साखर उद्योगाशी संंबंधित नेते जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, साखर आयुक्त सौरभ राव यांच्यासह अर्थ, सहकार व कृषी खात्याचे सचिव उपस्थित होते.

अडचणीतील कारखान्यांना थकहमी दिली नाही तर हे कारखाने सुरूच होऊ शकणार नाहीत. यंदा ऊस चांगला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस शिल्लक राहिला तरी त्याचे पैसे सरकारला द्यावे लागतील. त्याएेवजी १८०० कोटींची थकहमी देऊन कारखाने कसे सुरू होतील यासाठी यासाठी प्रयत्नाचा निर्णय झाला. तसा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्यात यावा, अशा सूचना करण्यात आल्या. सहवीज प्रकल्प असलेल्या ज्या कारखान्यांचे वीज खरेदी करार संपले आहेत असे करार नव्याने करताना महावितरण प्रतियुनिटचा दर ३.५० पैसे देत आहे. त्याएेवजी प्रतियुनिट ५ रुपये असावा अशी मागणी बैठकीत झाली.

बातम्या आणखी आहेत...