आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्यन्स समूहाच्या वतीने पीएम केअर फंड, नॅशनल डिफेन्स फंड आणि पीएम नॅशनल रिलीफ फंड या राष्ट्रीय स्तरावरील कोषात प्रत्येकी ५०० कोटी, राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २०० कोटी आणि मुख्यमंत्री कामगार निधीला १०० कोटी याप्रमाणे तब्बल १८०० कोटी रुपयांचा निधी सामाजिक दायित्व म्हणून समर्पित करणार आहे. याची घोषणा गुरुवारी समुहाचे सीईओ मनोहर जगताप यांनी केली. समुहाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जगताप यांनी राष्ट्रीय व राज्य सहायता कोषात भरीव योगदान देण्याचे जाहीर कले. तसेच कोरोना काळात व नंतरही ३७ व्हेंटीलेटर लोकार्पण केले जातील. तथापि, औंध येथील रुग्णालयाला प्रातिनिधिक स्वरूपात स्व. सुनील मुरलीधर जगताप यांच्या स्मरणार्थ श्रीमती वत्सलाबाई मुरलीधर जगताप यांच्या हस्ते डॉ. गिरीष कुऱ्हाडे यांना दोन व्हेंटीलेटर सुपूर्द केले आहेत. जगताप म्हणाले, आर्यन्स समूह यावर्षी आपला यशोत्सव साजरा करत आहे. समुहाने आपल्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ केला असून येत्या २६ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कंपनीच्या १२० एकरवरील नैसर्गिक स्त्रोतातून साकारल्या जाणाऱ्या मुख्य कार्यालयाचे भूमिपूजन होईल. आर्यन्स समूह रिफायनरी, एक्सर ई-बाईक, लिथियम आयन बॅटरी, सोडियम आयन बॅटरी, हायड्रोजन फ्युएल, बायोफ्युएल, विन एअर, आद्या एअर कॅब सर्व्हिसेस या उपक्रमांसह दळणवळण क्षेत्रात पदार्पण करत आहे. तसेच सेंद्री शेती, होम अप्लयन्सेस, ह्युमन रोबोट, सोलार एनर्जी आदी ४७ क्षेत्रांत सेवारत राहणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. यातील काही उपक्रमांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते केले जाईल. एक्सर ई-बाइकचेही केले वाटप राज्यातील ग्रामीण भागात आरोग्यसेवेत कार्यरत वर्कर्स, महाराष्ट्र पोलिस दल व पुणे पोलिसांना प्रत्येकी शंभर याप्रमाणे ३०० एक्सर ई-बाईक समुहाच्या वतीने मोफत वाटप केल्या जात आहेत. आर्यन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकुंद जगताप, ओमा पाउंडेशनचे अध्यक्ष अजय जगताप, संचालक संजय शेंडगे, कामेश मोदी, किरण लोहार आदी संचालकांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाच्या संयोजनासाठी ग्रुपचे इव्हेंट हेड प्रवीण वानखेडे, निखिल जाधव, अविनाश उबाळे, प्रवीण कदम परिश्रम घेत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.