आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात 18 वे जागतिक मराठी संमेलन:चित्रपटात साकारलेल्या भूमिकेने कलाकार समृध्द होत असतो - अभिनेते सयाजी शिंदे

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपटात साकारलेल्या भूमिकेने कलाकार समृध्द होत असतो कधी अस्वस्थ होत नाही असे मत ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. 18 व्या जागतिक मराठी संमेलनातील माझा चित्र प्रवास या कार्यक्रमात ते बोलत होते. दिग्दर्शक नागराज मंजुळे, युवा कलाकार आकाश ठोसर, अभिनेते सयाजी शिंदे आणि जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे व्यासपीठावर होते.

सयाजी शिंदे म्हणाले, आजवर विविध भाषेतील सुमारे 500 पेक्षा अधिक चित्रपटात काम केले आहे. प्रेक्षकांना भूमिका आवडली की ते नक्कीच डोक्यावर घेतात. आणि हाच कलाकारांच्या दृष्टीने ड्रीम रोल असतो. तेलगू,तामिळ , मराठी, कन्नड अशा विविध भाषेतील चित्रपटात विविध भूमिका साकारता आल्या आहेत याचे समाधान आहे. आणि प्रत्येक भाषेतील पहिल्या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला आहे. काम करीत असताना भाषा ही महत्वाची असते. त्या माध्यामतून रसिकांपर्यंत पोहोचता येते. असे देखील ते म्हणाले.

मंजुळे म्हणाले, चित्रपट क्षेत्रात येईन असं वाटले नव्हते. तसे स्वप्न नव्हते. पण या क्षेत्रात काम करतांना अनेकविध अनुभव आले आहेत. प्रत्येक टीका, प्रेम, ठेच, हे बऱ्याच गोष्टी शिकवितात. नेहेमी प्रवाहात राहिलो. त्याचा फायदा झाला आहे. चांगला चित्रपट प्रेक्षक पहातात, त्याचा मनापासुन आनंद घेतात. हेच आपले समाधान आहे. यातून नव निर्मितीची प्रेरणा मिळते.

फुटाणे यांनी सांगितले की, कलाकार हा नेहेमी चांगल्या भूमिकेच्या शोधात असतो. तशी भूमिका मिळाली की आपोआप ती साकारली जाते. शिंदे यांनी तेच केले त्यामुळे ते एकाच भूमिकेत अडकले नाहीत. वाचन संस्कृतीला पर्याय नाही. तसेच प्रत्येक कवितेची भाषा ही कविची स्वतःची असते. हे समजून घेतले पाहिजे. यावेळी आकाश ठोसर यानेही मनोगत व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...