आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • 19 Thousand 77 Livestock Have Died Due To Lumpy Disease In The State So Far, The Central Government Team Is On A Three day Tour Of The State.

राज्यात लम्पी आजाराने आत्तापर्यंत 19 हजार 77 पशुधनाचा मृत्यू:केंद्र शासनाचे पथक राज्यात तीन दिवसांच्या दौऱ्यावर

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यामध्ये लम्पी आजाराने आत्तापर्यंत 34 जिल्ह्यांमधील एकूण तीन हजार 666 संसर्ग केंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण दोन लाख 82 हजार 595 बाधित पशुधनापैकी एकूण दोन लाख पाच हजार 110 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत.

बाधित पशुधनापैकी 19 हजार 77 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 7274 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईसाठी 18.49 कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 144.12 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 137.97 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे 98.61 % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे. महाराष्ट्रातील लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहे.राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त यांनी लम्पी रोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी “माझा गोठा, स्वच्छ गोठा” अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सर्वसाधारणपणे गोधनास कळपामध्ये चरण्यासाठी पाठविणे आणि सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी पाजण्यासाठी कळपाने नेण्याच्या गावांमधील दोन्ही पद्धती देखील लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भावास कारणीभूत असल्याचे मत राज्यस्तरीय कार्यदलाने व्यक्त केले असल्यामुळे पशुसंवर्धन आयुक्त यांनी या दोन्ही पद्धती लम्पी चर्मरोग नियंत्रणात येईपर्यंत बंद ठेवण्याबाबत गोपालकांमध्ये जागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

लम्पी चर्म रोगाचा आलेख राज्यात घटत असून लम्पी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. हा आजार गाई व बैलांपासून किंवा गाईच्या दुधापासून मानवामध्ये संक्रमित होऊ शकत नाही. हा आजार फक्त पशुधनामध्ये आढळून येतो.अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र.1800-2330-418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र.1962 गरजूनी तात्काळ संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...