आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना व्हॅक्सीनची पहिली खेप मंगळवारी सकाळी पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूमधून रवाना झाली. ज्या ट्रकमधून हे नेण्यात आले, त्याचे टम्परेचर तीन डिग्री ठेवण्यात आले. येथून व्हॅक्सीनचे 478 बॉक्स देशाच्या 13 शहरांमध्ये पोहोचवण्यात येतील. प्रत्येक बॉक्सचे वजन 32 किलो आहे. व्हॅक्सीनने भरलेले ट्रक रवाना करण्यापूर्वी सीरम इंस्टीट्यूमध्ये पूजा करण्यात आली.
Civil aviation sector launches yet another momentous mission.
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) January 12, 2021
Vaccine movement starts.
First two flights operated by @flyspicejet & @goairlinesindia from Pune to Delhi & Chennai have taken off. pic.twitter.com/uo11S4OvqK
#WATCH | Three trucks carrying Covishield vaccine reached Pune airport from Serum Institute of India's facility in the city, earlier this morning.
— ANI (@ANI) January 12, 2021
From the airport, the vaccine doses will be shipped to different locations in the country. The vaccination will start on January 16. pic.twitter.com/v3jk4WUyyq
पहिल्या चरणात, दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, करनाल, हैदराबाद, विजयवाडा, गुवाहाटी, लखनौ, चंडीगड आणि भुवनेश्वरमध्ये हवाई मार्गाने व्हॅक्सीन पोहोचवण्यात येईल. मुंबईमध्ये थेट ट्रकने व्हॅक्सीन पाठवण्यात येईल.
गुजरातला सर्वात पहिले मिळणार व्हॅक्सीन
कोरोना व्हॅक्सीनची पहिली खेप सर्वात पहिले एअर इंडियाच्या फ्लाइटने गुजरातला पाठवण्यात येत आहे. गुजरातचे उप-मुख्यमंत्री नितिन पटेल यांनी सोमवारी सोशल मीडियावर सांगितले होते की, त्यांच्या राज्यात व्हॅक्सीनची पहिली खेप सकाळी पावने अकरा वाजता पोहोचेल. अहमदाबादचे सरकार वल्लभभाई पटेल एअरपोर्टवर व्हॅक्सीनची डिलीव्हरी होईल.
56.5 लाख डोज डिलीव्हर होतील
विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले की पुण्याहून एअर इंडिया, स्पाइसजेट आणि इंडिओ एअरलाइन्सच्या 9 फ्लाइटमधून लसीचे 56.5 लाख डोस वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठवले जातील. ही शहरे दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवाहाटी, शिलांग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पटना, बेंगलुरू, लखनऊ आणि चंदीगड अशी असतील.
केंद्राने सहा कोटींपेक्षा जास्त डोजची ऑर्डर दिली
केंद्र सरकारने सोमवारी सीरम इंस्टीट्यू आणि भारत बायोटेकला कोरोना व्हॅक्सीनचे सहा कोटींपेक्षा जास्त डोजची ऑर्डर दिली. सरकार सर्वात पहिले देशातील तीन कोटी फ्रंटलाइन हेल्थ वर्कर्सला कोरोनाची लस देणार आहे. ज्याची सुरुवात 16 जानेवारीपासून होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारीही सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती आणि व्हॅक्सीनसंबंधीत तयारीचा आढावा घेतला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.