आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातून अमली पदार्थ 2 तस्करांना अटक:मेफेड्रॉन, चरसची विक्री करणाऱ्या दोघांकडून सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेफेड्रॉन, चरसची विक्री करणाऱ्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली. त्यांच्याकडून मेफेड्रॉन, चरस अमली पदार्थांसह मोबाइल, इतर ऐवज मिळून 2 लाख 15 हजारांचे साहित्य जप्त केले आहे अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.

आकाश महेंद्र ठाकर (वय 22 रा. आनंदनगर हिंगणे,पुणे ) आणि अनिकेत जनार्दन धांडेकर (वय 20 रा. सिंहगड रोड, हिंगणे खुर्द,पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

दोघेजण सिंहगड ठाण्याच्या हद्दीत मेफेड्रॉन आणि चरसची तस्करी करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून आकाशकडून 48 हजारांचे चरस, मोबाइल दुचाकी जप्त केली. अनिकेतकडून 87 हजारांचे मेपेड्रॉन, मोबाइल असा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, एपीआय लक्ष्मण ढेंगळे, एपीआय शैलजा जानकर, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, राहुल जोशी, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली.

गुन्हा दाखल

खोटे कुलमुखत्यार आधारे खोटे बक्षीसपत्र तयार करणर्‍यांवर विमानतळ पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बाळासाहेब गंगाराम ढमाले (57, रा. आंबेगाव), सुषमा आत्माराम मोकाशी (42, रा. ओम सदन, बाणेर), सिमा भिमराव म्हस्के (42, रा. रहाटणी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिनेश आण्णासाहेब जगताप (29, रा. यशोदा नंदन सोसायटी, विमाननगर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 11 ऑगस्ट 2018 मध्ये घडला.लोहगाव येथभल सर्व्हे नंबर 211 हिस्सा नंबर 4/2-4 मधील कोनार्क नगर येथील को-ऑपरेटिव्ही हाऊसिंग सोसायटी येथभल दुकान गाळा नंबर 1 विक्री करण्याचा ठराव करून त्या बदल्यात 18 लाख घेऊन बनावट कुलमुखत्यार पत्र तयार करून त्या आधारे खोटे बक्षीसपत्र तयार केले. त्यावर बाळासाहेब ढमाले यांच्या बनावट सह्या करून त्याचा दस्त दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविला.

बातम्या आणखी आहेत...