आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पेट्रोलपंपावर 2लाख 30 हजारांची लूट, घटना सीसीटीव्हत कैद

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणे-सातारा मार्गावरील एच पी पेट्रोलपंपावरील घटना

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत पेट्रोल पंपावर लूट केल्याची घटना घडली आहे. पुणे-सातारा महामार्गावरील खेडशिवापुरच्या एच पी पेट्रोलपंपावर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लूट करण्यात आली आहे. या घटनेत 2 लाख 30 हजार रुपये लुटले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास दोन तरुण पेट्रोल पंपाच्या ऑफीसमध्ये आले आणि त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 2 लाख 30 हजार रुपये लूटले. यानंतर पहाटे अंधाराचा फायदा घेत त्यांनी साताऱ्याकडे पळ काडला. दरम्यान, ही संपूर्ण घटना पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...