आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांच्या हस्ते गौरव:विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय सेवा देणाऱ्यांचा सन्मान; 6 ऑक्टोबरला पार पडणार सोहळा

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या कार्याद्वारे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय सेवा देणाऱ्या व्यक्तींना मुंबईत राजभवनात राज्यपाल भगतिंग कोश्यारींच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा गुरूवारी (6 ऑक्टोबर) पुण्यात होणार आहे. मातंग समाजमित्र आणि मातंग समाजरत्न असा हा पुरस्कार असणार आहे.

धनंजय भिसेंची माहिती

या समारंभास राज्यपालांसह संत तुकाराममहाराज यांचे वंशज ह.भ. प.शिवाजीमहाराज मोरे व डॉ. रमेश पांडव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राजभवनातील राजशिष्टाचाराला अनुसरून सदर समारंभ संपन्न होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातून 300 समाजबांधवांना एकाच वेळेस राजभवनात प्रवेश देण्यात आलेला आहे. ही घटना स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मातंग समाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे अशी माहिती धनंजय भिसे यांनी सोमवारी दिली आहे.

हे आहेत मानकरी

ह्या कार्यक्रमास ह.भ.प.डॉ. भगवानबाबा आनंदगडक (जालना) व कर्मवीर दादा इदाते ( अध्यक्ष,केंद्रीय भटके विमुक्त आयोग,दिल्ली) यांना मातंग समाजमित्र पुरस्कार, तर नागपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे यांना मातंग समाजरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच विशेष क्षेत्रांमधील कार्याबद्दल प्रा. ईश्वर नंदपुरे (अध्यक्ष, समरसता साहित्य परिषद),डॉ संजय देशपांडे (रशियात अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात महत्त्वपूर्ण योगदान), प्राचार्य डॉ. अरुण आंधळे (शिक्षण), राजन लाखे (साहित्य व साहित्यिक चळवळ),डॉ. अशोक कांबळे,नागपूर(बँड कलाकारांच्या जीवनावर पीएच.डी.), सुनील वारे (रशियात अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात महत्त्वपूर्ण योगदान प्रातिनिधिक सन्मान),आदित्य सुभाष केळकर (उद्योग ) ह्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

लोककलावंतांचाही सन्मान

शाहीर नंदेश उमप (ठाणे), गायिका वैशाली माडे (मुंबई), शाहीर बापू पवार,गायिका राधा खुडे,शाहीर सुनील साठे (मुंबई) ,लोकगायक संजय ठोसर(नागपुर), लोकगायक.बाळू शिंदे (पुणे), बालशाहीर आविष्कार एडके(अंबाजोगाई) ,शाहीर आसाराम कसबे (पिंपरी चिंचवड) या लोककलावंतांचाही विशेष सन्मान या प्रसंगी करण्यात येणार आहे.

यांची असणार उपस्थिती

सदर समारंभास निलेश गद्रे,हेमंत हरहरे आमदार सुनील कांबळे ,आमदार नामदेव ससाणे,भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे, राजेश पांडे, सुधाकर भालेराव,पद्मश्री मिलिद कांबळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...